मुंबई, 8 ऑगस्ट, 2023 (GPN): श्री. अजय सावंत (बदलेले नाव) नावाच्या 40 वर्षांच्या तरुणाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. खासकरून पायऱ्या चढ-उतार करताना त्याला थाप लागण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले होते. सावंत यांनी मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट रुग्णालयाशी संपर्क साधला होता आणि हृदयविकारतज्ज्ञ डॉ.परीन संगोई हे त्याच्यावर उपचार करत होते. डॉ.परीन संगोई यांनी श्री. अजय यांना होत असलेल्या त्रासाचे मूळ शोधण्यासाठी काही चाचण्या करण्यास सांगितल्या होत्या. चाचण्यांमध्ये दिसून आलं ही हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या बाजूच्या धमनीमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले होते. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास तपासला असता त्याला सप्टेंबर 2020 मध्ये कोविड-19 झाला होता आणि त्याने कोविडच्या लसीचे 3 डोसही घेतले होते. परंतु तरुणपणीच रुग्णाला थाप लागण्याचा होत असलेला त्रास डॉक्टरांना चिंतेची बाब वाटली होती. यामुळे त्यांनी रुग्णाची स्ट्रेस टेस्ट चाचणीही (ट्रेड मिल टेस्ट) घेतली होती. ही चाचणी 25 एप्रिल 2023 रोजी झाली होती. यामध्ये हृदयाला गरजेपेक्षा कमी रक्तपुरवठा होत असल्याचं दिसून आलं होतं. यामुळे रुग्णावर आणखी काही चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मंगलवार, 8 अगस्त 2023
कोविड-19 झालेल्या आणि स्ट्रेस टेस्ट पॉझिटीव्ह आलेल्या तरुण रुग्णाला वाचविण्यात आले यश डॉ. परीन संगोई, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल.
मुंबई, 8 ऑगस्ट, 2023 (GPN): श्री. अजय सावंत (बदलेले नाव) नावाच्या 40 वर्षांच्या तरुणाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. खासकरून पायऱ्या चढ-उतार करताना त्याला थाप लागण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले होते. सावंत यांनी मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट रुग्णालयाशी संपर्क साधला होता आणि हृदयविकारतज्ज्ञ डॉ.परीन संगोई हे त्याच्यावर उपचार करत होते. डॉ.परीन संगोई यांनी श्री. अजय यांना होत असलेल्या त्रासाचे मूळ शोधण्यासाठी काही चाचण्या करण्यास सांगितल्या होत्या. चाचण्यांमध्ये दिसून आलं ही हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या बाजूच्या धमनीमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले होते. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास तपासला असता त्याला सप्टेंबर 2020 मध्ये कोविड-19 झाला होता आणि त्याने कोविडच्या लसीचे 3 डोसही घेतले होते. परंतु तरुणपणीच रुग्णाला थाप लागण्याचा होत असलेला त्रास डॉक्टरांना चिंतेची बाब वाटली होती. यामुळे त्यांनी रुग्णाची स्ट्रेस टेस्ट चाचणीही (ट्रेड मिल टेस्ट) घेतली होती. ही चाचणी 25 एप्रिल 2023 रोजी झाली होती. यामध्ये हृदयाला गरजेपेक्षा कमी रक्तपुरवठा होत असल्याचं दिसून आलं होतं. यामुळे रुग्णावर आणखी काही चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें