• नवीन आसन व्यवस्था अनेक आरामदायी सुविधा देण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आली आहे, या आसनांमुळे प्रवाशांना प्रथम श्रेणीच्या विमानप्रवासाचा अनुभव मिळणार आहे
• अत्युच्च आराम व लवचिकतेसाठी 180 अंशात फिरणारी नवोन्मेषकारी आसने देण्यात आली आहेत
मुंबई, 28 जुलै 2023 (TGN): पिनॅकल इंडस्ट्रीज या भारतातील वाहन अंतर्गत रचना, आसन प्रणाली, ईव्ही सुटे भाग आणि स्पेशॅलिटी वाहने आदींचे उत्पादन करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने, भारतीय रेल्वेच्या निवडक वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन्ससाठी प्रगत आसन व्यवस्था आणल्याचे, अभिमानाने, जाहीर केले आहे. व्यावसायिक वाहन आसनव्यवस्था, अंतर्गत रचना व सुट्या भागांच्या उद्योगातील बिनतोड ज्ञान व कौशल्यामुळे, पिनॅकल रेल्वे आसन विभागाने, सुरक्षितता व आरामदायीपणाच्या जागतिक मानकांची पूर्तता करणाऱ्या भारतातील प्रमाणित रेल्वे आसनव्यवस्थेच्या रचना, इंजिनीअरिंग व उत्पादनात विशेष कौशल्य प्राप्त केले आहे.
नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर 12-14 ऑक्टोबर 2023 या काळात भरणाऱ्या आगामी इंटरनॅशनल रेल्वे इक्विपमेंट एग्झिबिशनच्या (आयआरईई) पंधराव्या पर्वात, आपली अनेकविध उत्पादने व तंत्रज्ञाने प्रदर्शनासाठी ठेवणार असल्याचेही, कंपनीने जाहीर केले. आयआरईई हे रेल्वे वाहतूक क्षेत्रातील आशियामधील सर्वांत मोठे प्रदर्शन असून, कन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीद्वारे (सीआयआय) भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने, आयोजित केले जाते.
पिनॅकल इंडस्ट्रीजच्या नवीन आसान व्यवस्थेतील सर्वसमावेशक श्रेणीमध्ये, रेल्वे प्रवासांदरम्यान अद्वितीय आराम, सुरक्षितता व अखंडतेची भावना देणाऱ्या, इकोनॉमी, एग्झिक्युटिव, टिप-अप आणि फोल्डिंग सीट्सचा समावेश होतो. इकोनॉमी सीट्सची रचना हुशारीने करण्यात आली असून, सिंगल-सीटर, टू-सीटर व थ्री-सीटर असे वेगवेगळ्या आसन क्षमतांचे पर्याय यात आहेत. प्रवाशांच्या सोयीला सर्वाधिक प्राधान्य आहे. प्रत्येक आसनाला मोड्युलर प्रकारचे चार्जिंग युनिट देण्यात आले आहे. जेणेकरून, प्रवाशांना प्रवासादरम्यान उपकरणांचे चार्जिंग करणे व त्याद्वारे बाहेरील जगाशी जोडलेले राहणे शक्य होईल. शिवाय, एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन केलेल्या सीट फोनमुळे प्रवासादरम्यान आवश्यक तो आधार व आराम मिळतो. तसेच आसन अनुभव अधिक चांगला होण्यासाठी दबावाचे मॅपिंगही विचारात घेण्यात आले आहे.
एग्झिक्युटिव सीट्सची रचना अव्वल दर्जाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशांना कमाल आराम व लवचिकता देण्यासाठी अनेक नवोन्मेषकारी सुविधा आहेत. लक्षणीय बाब म्हणजे, प्रवाशांना 180 अंशात फिरणाऱ्या आसनाची सुविधा यात आहे. त्यामुळे प्रवासी हव्या त्या पद्धतीने त्यांच्या आसनाची स्थिती जुळवून घेऊ शकतात. प्रवासादरम्यान शिथिल बसण्यासाठी, आजूबाजूच्यांशी संवाद साधण्यासाठी किंवा काम करण्यासाठी जशी हवी तशी स्थिती प्रवासी घेऊ शकतात. अधिक सुरक्षितता व सुलभ वापरासाठी, पेडल यंत्रणा वापरून आसनाचे परिभ्रमण (रोटेशन) 90 अंशांवर लॉक किंवा अनलॉकही करता येते. प्रवाशांना सोयीस्कर व्हावे म्हणून आसनाच्या डिझाइनमध्ये विचारपूर्वक बाजूने हॅण्डलही देण्यात आले आहे. शिवाय, प्रवाशांना सोयीस्कर असे फूटरेस्ट 3 समायोजनशील स्टॉप्ससह देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान पायांना हवा तसा आधार प्रवासी घेऊ शकतील. यामुळे एकंदर प्रवासातील आराम वाढेल. एग्झिक्युटिव सीट्स वॅगो कनेक्टर घटकांनी सुसज्ज आहेत. त्यामुळे विविध सुविधांसाठी सुलभपणे विजेची जोडणी उपलब्ध होते. प्रत्येक आसनाला मोड्युलर प्रकारचे चार्जिंग युनिट देण्यात आले आहे. जेणेकरून, प्रवाशांना प्रवासादरम्यान उपकरणांचे चार्जिंग करणे व त्याद्वारे बाहेरील जगाशी जोडलेले राहणे शक्य होईल.
अधिक व्यवहार्यतेसाठी एग्झिक्युटिव सीट्सच्या बाजूचे आर्मरेस्ट्स घडी घालण्याजोगे (फोल्डेबल) ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आसनांमधून हालचाल करणे सोपे झाले आहे. शिवाय मधील आर्मरेस्टला संकन स्नॅक ट्रे देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त कार्यात्मक जागा मिळू शकेल. प्रवाशाच्या कमरेला पुरेसा आधार आणि आराम मिळावा या दृष्टीने आसनातील फोमची रचना एर्गोनॉमिक पद्धतीने करण्यात आली आहे. अधिक प्रसन्न व शिथिल प्रवासाच्या अनुभवासाठी प्रेशर मॅपिंग विचारात घेण्यात आले आहे. एग्झिक्युटिव सीट्सचे इलेक्ट्रिकल हार्नेस आसनाच्या अॅल्युमिनिअमच्या भागातून नेऊन बसवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यूत जोडण्या संरक्षित व कार्यक्षम राहतील आणि आसान व्यवस्थेची एकंदर सुरक्षितता व खात्रीशीरता उत्तम राहील.
जागेचा पुरेपूर वापर करण्यासाठी टिप-अप सीट्स आणि फोल्डिंग सीट्सही देण्यात आल्या आहेत. लवचिकता व बहुपयोगीत्व निर्णायक आहे अशा ठिकाणी या सीट्स उत्तम ठरतात. उपयोगात नसतील त्यावेळी प्रवासी या आसनांच्या सहज घड्या करून ठेवू शकतात. त्यामुळे प्रवाशांसाठी किंवा सामानासाठी अतिरिक्त जागा मिळू शकते.
तपशिलांवर बारीक लक्ष पुरवून तसेच टिकाऊपणा व दीर्घायुष्याची खात्री देणारे उच्च दर्जाचे साहित्य वापरून हे सर्व आसान पर्याय घडवण्यात आले आहेत. फायबर रिएन्फोर्स्ड पॉलीमरपासून (एफआरपी) आसने तयार करण्यात आली आहेत. हे साहित्य गंजरोधक तसेच देखभालीसाठी किफायतशीर म्हणून ओळखले जाते. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, ही आसने अग्निशमनाच्या युरोपीय मानकांची पूर्तता करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा स्तर अधिक उंचावला आहे.
पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुधीर मेहता ह्यांनी या लक्षणीय घटनेबद्दल उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, "आमच्या प्रगत आसन उत्पादनांचे अनावरण भारतातील वंदे भारत ट्रेन्ससाठी करणे आमच्यासाठी रोमांचक अनुभव आहे. या महत्त्वपूर्ण घटनेमुळे, प्रवाशांच्या सुरक्षितता व आरामाला प्राधान्य देणारी तसेच सौंदर्यपूर्ण उत्पादने निर्माण करण्यातील व ती योग्य ठिकाणी पोहोचवण्यातील आमचे अविचल समर्पण अधिक दृढ झाले आहेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे रेल्वे आणि अन्य क्षेत्रांसाठी नवोन्मेषकारी, किफायतशीर व टिकाऊ जागतिक दर्जाची उत्पादने डिझाइन व उत्पादित करण्याप्रती आमच्या आशावादावर प्रकाश टाकला गेला आहे. रेल्वे क्षेत्राच्या भारतातील व जगभरातील, प्रचंड वाढीच्या संभाव्यतेवर आमचा विश्वास आहे. नवीन युगातील, वेगवान ट्रेन्स सर्वांचे लक्ष वेधून घेत असतानाच, अधिक सुरक्षित, अधिक आरामदायी व दिसण्यास आकर्षक आसनांची मागणीही चढी आहे. आम्ही बाजारात आणत असलेल्या प्रत्येक उत्पादनाच्या माध्यमातून ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. ही नवीन आसन व्यवस्था प्रवाशांना अधिक सुधारित व आनंददायी प्रवास अनुभव देईल आणि उद्योगक्षेत्रात एक नवीन मापदंड स्थापन करेल असे आम्हाला वाटते. ”
ते पुढे म्हणाले, “पिनॅकल इंडस्ट्रीजवर विश्वास टाकल्याबद्दल आम्ही भारतीय रेल्वे आणि इंटिग्रल कोच फॅक्टरीप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. प्रस्थापित संस्थात्मक व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या एका उद्योगक्षेत्रातील पिनॅकल इंडस्ट्रीज ही अभिमानाने रेल्वे आसनव्यवस्था व्यवसाय करणारी भारतीय कंपनी आहे. ह्या संधीमुळे आम्हाला अधिक परिश्रम करण्यासाठी व अपेक्षेहून अधिक चांगली कामगिरी करून भारतीय रेल्वेच्या यशात व वाढीत योगदान देणारी अपवादात्मक दर्जाची आसन उत्पादने तयार करण्यासाठी चालना मिळत आहे."
पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अरिहंत मेहता म्हणाले, “वंदे भारत ट्रेन्ससाठी अत्याधुनिक आसन व्यवस्था पुरवून भारतातील प्रवासाचे चित्र पालटण्याच्या कामात अग्रभागी राहिल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. नवोन्मेष, दर्जा, प्रवासीकेंद्री रचना ह्यांच्याप्रती अविचल बांधिलकी राखत, आम्ही विख्यात डिझायनर्स व इंजिनीअर्सशी सहयोग केला आहे आणि त्यातूनच ही प्रगत आसन व्यवस्था विकसित झाली आहे. अपवादात्मक दर्जाच्या वाहतूक सुविधा देण्यातील आमच्या अनेक दशकांपासूनच्या कौशल्याच्या तसेच गुणवत्ता सिद्ध केलेल्या कामगिरीच्या जोरावर, ही आसन व्यवस्था प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव बदलून टाकेल आणि उद्योगक्षेत्रातही सुरक्षितता, आराम व सोयीस्करतेचे नवीन मापदंड स्थापन होतील, असा विश्वास आम्हाला वाटतो. प्रवाशांच्या अपेक्षा केवळ पूर्ण न करता त्यापलीकडील कामगिरी करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. जेणेकरून त्यांना आनंददायी व अखंड प्रवासाचा अनुभव मिळू शकेल. तंत्रज्ञानात्मक व रचनात्मक उत्कृष्टतेसाठी आम्ही निर्धाराने काम करत आहोत. तसेच प्रवाशांचा आराम वाढवण्यसाठी आणि उद्योगक्षेत्रातील मापदंड उंचावण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत."
पिनॅकल इंडस्ट्रीच्या प्रगत आसन व्यवस्थेमध्ये अत्याधुनिक सुरक्षितता सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. यात आसनांसाठी वापरलेले कुशन फोम EN45545-2 HL2 मानकांची पूर्तता करणारे आहे आणि ते अग्निशामक कापडाने गुंडाळलेले आहे. त्यामुळे प्रवाशांना उच्च स्तरावरील अग्नी सुरक्षितता मिळते. तसेच यात एर्गोनॉमिक सीट बेल्ट्सही आहेत. जागेचा पुरेपूर वापर करण्याच्या उद्देशाने आसनांची रचना करण्यात आली आहेत आणि यात सोयीस्कर सुविधाही देण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, वस्तू ठेवण्यासाठी पुरेशी जागा, चार्जिंग पॉइंट्स, समायोजनशील हेडरेस्ट्स आदी. त्यामुळे प्रवास अखंड व आनंददायी होणार आहे. Ends
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें