शुक्रवार, 4 अगस्त 2023

एआयसी पिनॅकलतर्फे नावीन्यपूर्ण संकल्पनांना व्यावसायिक पातळीवर नेण्यासाठी स्टार्टअपना सक्षम करणारा “इव्हॉल्व्ह” हा 10 महिन्यांचा इनक्युबेशन प्रोग्राम सादर


मुंबई
, ऑगस्ट, 2023 (TGN): अटल इनक्युबेशन सेंटर (एआयसी) - पिनॅकल एंटरप्रेनरशिप फोरमला त्यांचा बहुप्रतीक्षित इव्हॉल्व्ह इनक्युबेशन प्रोग्रॅम सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. हा 10 महिन्यांचा परिवर्तनकारी कार्यक्रम असून नावीन्यपूर्ण संकल्पनांना फलद्रूप करणे आणि स्टार्टअप्ससाठी फायदेशीर व्यवससायांना चालना देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाला अटल इनोव्हेशन मिशन आणि निति आयोगाचे सहाय्य लाभले असून इव्हॉल्व्ह आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक जगात सहभागींना आवश्यक असलेली साधने, मार्गदर्शन आणि स्रोतांनी सज्ज करतो.

उद्योजकांना मदत आणि सबलीकरण करण्याच्या सातत्यपूर्ण प्रतिबद्धतेसह इव्हॉल्व्ह या कार्यक्रमाअंतर्गत पात्र स्टार्टअप्सना रु.25 लाखांपर्यंत बीजभांडव पुरविण्याची संधी देण्यात येते. यात AIM बीज भांडवल सहाय्य समाविष्ट आहे आणि अर्थायन या ॲक्सिलरेटर प्लॅटफॉर्मद्वारे माध्यमातून एंजल गुंतवणूकादारांच्या माध्यमातून नॉन-गव्हर्न्मेंट (अशासकीय) स्रोतांच्या माध्यमातून होणाऱ्या सहगुंतवणुकीचा समावेश आहे.

हा कार्यक्रम क्षेत्र-मर्यादित नाही. कोणत्या क्षेत्रातील संकल्पनाप्रूफ ऑफ कन्सेप्ट्स किंवा प्रोटोटाइपच्या टप्प्यावर असलेल्या स्टार्टअप्सना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात येत आहे. महिला नेतृत्व असलेले उद्योग आणि सरकारच्या फ्लॅगशिप कार्यक्रमांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना प्राधान्य देण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकूण 30 स्टार्टअप्सना सहभागी करून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा कालावधी 10 महिन्यांचा आहे. स्टार्टअपच्या विकासटप्प्याच्या आधारे त्यांना इक्विटीवर आधारित शुल्क किंवा इनक्युबेशन शुल्क यामधून निवड करण्याची लवचिकता प्रदान करण्यात आली आहे. एआयसी पिनॅकलमध्ये मेंटर्सकॉर्पोरेट्सगुंतवणूकदार टाय-अप्स मुबलक आहेत. त्यामुळे सहभागी स्टार्टअपना त्यांच्या उद्योजकतेच्या प्रवासात उत्तम सहाय्यमार्गदर्शन मिळण्याची खातरजमा करण्यात आली आहे.

एआयसी- पिनॅकल एंटरप्रेनरशिप फोरमचे संस्थापक आणि पिनॅकल इंडस्ट्रीज अँड एकाचे चेअरमन डॉ. सुधीर मेहता हा कार्यक्रम सादर करण्याबाबत खूपच उत्साहात होते. ते म्हणाले, "उद्योजकांच्या भावी पिढीचे सबलीकरण करणारा इव्हॉल्व्ह इनक्युबेशन प्रोग्रॅम सादर करताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. एआयसी पिनॅकलमध्ये आमचा नावीन्यपूर्ण संकल्पनांवर खूप विश्वास आहे आणि त्यांना सातत्यपूर्ण सहाय्य करण्यास आम्ही प्रतिबद्ध आहोत. इव्हॉल्व्हच्या स्ट्रॅटजिक मॉड्यूल्समध्ये उत्पादन विकासापासून ते अर्थसहाय्य व नेटवर्किंगपर्यंत विविध पैलू हाताळण्यात आले आहेत. आमच्या हायब्रीड दृष्टिकोनामुळे ॲक्सेसेबिलिटीची खात्री होते आणि ज्ञानपूर्ण सत्रांमुळे भक्कम पाया रचला जातो. तज्ज्ञ मेंटरआधुनिक स्रोतकायदेशीर सहाय्य आणि अर्थसहाय्य प्राप्त करण्याच्या संधी याचा स्टार्टअपना लाभ होईल. उद्योजकतेमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आणि उद्योगजगतात स्थान निर्माण करण्यासाठी सहभागी व्हा. चलाआपण एकत्रितपणे असीम भविष्य घडवू या!

उपलब्धता आणि परिणामकारकतेची व्याप्ती वाढविण्यासाठी इव्हॉल्व्ह कार्यक्रमात हायब्रीड दृष्टिकोन अंगीकारण्यात आला आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन घटकांची सांगड घालण्यात आली आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये समृद्ध करणारी सत्रे घेण्यात येणार आहेत आणि स्टार्टअपच्या यशासाठी भक्कम पायाभरणी केली जाणार आहे.

इव्हॉल्व्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून एआयसी पिनॅकल सातत्यपूर्ण सहाय्य करण्यास प्रतिबद्ध आहे. त्यांच्यातर्फे सहभागी स्टार्टअपना विविध प्रकारच्या सेवा प्रदान करण्यात येणार आहेत. यात प्रोटोटाइप तयार करण्यासाठी सहकार्यआधुनिक सॉफ्टवेअर व साधने उपलब्ध करून देणेआवश्यकतेनुसार चाचणी व प्रयोगशाळा सहाय्यप्रमाणपत्र मिळविण्यासाठी मार्गदर्शनतज्ज्ञांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक पायाभूत सुविधाकायद्यासंबंधी आणि बौद्धिक संपदेविषयी सहकार्य, नेटवर्किंगच्या संधीव्यवसाय नियोजन कौशल्यअत्यंत वैविध्यपूर्ण स्टार्टअप समुदायाशी संपर्कविविध शासकीय आणि अशासकीय एजन्सींकडून बीजभांडवल सहाय्य, बाजारपेठेत पदार्पण करण्याविषयी सहाय्यएंजल गुंतवणूकदार व व्हेंचर कॅपिटल फर्म्ससोबत मौल्यवान परिचयासाठी खास इन्व्हेस्टर डेमो डे यांचा समावेश आहे.

इव्हॉल्व्ह इनक्युबेशन प्रोग्रॅम हा विचारपूर्वक चार मॉड्यूल्समध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक मॉड्यूलमध्ये उद्योगासंबंधीचे महत्त्वाचे पैलू हाताळण्यात आले आहेत. प्रोडक्ट डेव्हलपमेंट हे पहिले मॉड्यूल आहे. यात स्टार्टअपने संकल्पनेपासून एक अनिवार्य मिनिमम व्हाएबल प्रोडक्ट (एमव्हीपी) कसे घडवायचे व त्याचे प्रोटोटाइप कसे तयार करायचे याबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येते. 'आयपी अँड लीगल' या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये कंपनी सुरू करणेबौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती देण्यात येते आणि पुढील वाटचालीसाठी भक्कम पायाभरणी केली जाते. 'बिझनेस प्लॅनिंग अँड फंडिंगया तिसऱ्या मॉड्यूलमध्ये उत्तम पिच प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी आणि बीजभांडवल मिळविण्यासाठी सहाय्य प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. 'नेटवर्किंग आणि गो-टू-मार्केट' मॉड्यूलमध्ये संभाव्य ग्राहकांसोबत आणि गुंतवणूकदारांसोबत जोडले जाण्यासाठी करण्यासाठी स्टार्टअपना मदत करण्यात येते. या अंतर्गत बी2बीबी2जी आणि बी2सी सपोर्टनिश्चित परिणाम साध्य करणाऱ्या डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटजी आणि अतुलनीय नेटवर्किंग संधी उपलब्ध करून देण्यात येतात.

इव्हॉल्व्ह इनक्युबेशन प्रोग्रॅमसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत आणि 10 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. हा कार्यक्रम 2 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे. या विलक्षण संधीमुळे उद्योजकतेच्या क्षेत्रात क्रांती घडून येणार आहे. स्टार्टअपना त्यांची कल्पना उंचीवर घेऊन जाण्यासाठी आणि उद्योगजगतावर छाप सोडण्यासाठी सबल करण्यात येणार आहे.



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें