L-R, Rahul Dhamdhere, CMO KidZania and Viral Oza, Chief Marketing Officer, Mahindra Lifespaces Developers Limited at the launch |
घाटकोपर येथील आर सिटी मॉलमधील किड्झेनियामध्ये मुलांसाठी नव्या युगातील शाश्वत अनुभव केले स्थापित.
तो घडवतील पर्यावरणस्नेही ऊर्जानिर्मितीसाठी चालना.
मुंबई, 10 ऑगस्ट, 2023 (TGN/ Sachin): महिंद्रा ग्रुपच्या महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड (एमएलडीएल) या रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर विकास विभागातर्फे मुंबईतील किड्झेनियाशी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीतून शाश्वत भविष्यासाठी लहान मुलांना वास्तुरचनाकार म्हणून घडविण्यासाठी सक्षम करण्यात येणार आहे. या अभिनव भागीदारींमध्ये महिंद्रा लाइफस्पेसेसचा 'क्राफ्टिंग लाइफ'चा निर्धार आणि किड्झेनियाची सक्रिय एज्युटेनमेंट यांची सांगड घालण्यात आली आहे. किड्झेनिया मुंबईमधील आगामी अनुभवात खेळ व कृतीच्या माध्यमातून शाश्वततेबद्दल जाणून घेण्यासाठी मुलांना खिळवून ठेवणारे व सक्रिय करणारे अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.हा उपक्रम महिंद्रा लाइफस्पेसेच्या 'ग्रीन आर्मी' या फ्लॅगशिप सीएसआर कार्यक्रमाशी सुसंगत आहे. ग्रीन आर्मी या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरित करण्यात येते. 'दहा लाख काळजीवाहरक नागरिक' घडविण्याच्या उद्दिष्टाने महिंद्रा लाइफस्पेसेस मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, नागपूर, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू येथील 472 शाळा, 77,000 मुले आणि 3 लाख नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत.
महिंद्रा लाइफस्पेसेसच्या “एक्स्पिरिअन्सेस”तर्फे लहान मुलांना त्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी आणि शाश्वत विकासाविषयी जाणून घेण्यासाठी एक रोमांचक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. सस्टेनेबल डिझाइन स्टुडियो, ग्रीन पॉवर झोन आणि कन्स्ट्रक्शन झोन या तीन निश्चित अनुभवांसह मुलांना शाश्वत पद्धती व त्यांचे लाभ प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येतील. या अत्याधुनिक सस्टेनेबल डिझाइन स्टुडियोमध्ये मुले त्यांच्या स्वतःच्या शाश्वत विकासाची रचना आणि निर्मिती करू शकतात आणि त्यातून ती शाश्वत जीवनशैलीचे फायदे समजून घेऊ शकतील. ग्रीन पॉवर झोनमध्ये मुलांना नवीकरणीय ऊर्जेची माहिती मिळेल आणि कन्स्ट्रक्शन झोनमध्ये लहान मुले खेळण्यातल्या (इमिटेशन) विटा व सिमेंटचा वापर करून त्यांची स्वतःची घरे बांधू शकतात. वरच्या मजल्यांपर्यंत मटेरिअल वाहून नेण्यासाठी तिथे खऱ्याखुऱ्या क्रेनसुद्धा आहेत.
ही कृती पूर्ण केल्यावर मुलांना ‘ग्रीन आर्मी आर्किटेक्ट’चे प्रमाणपत्र देखील मिळेल. ते विकासाची निर्मिती करू शकतात आणि भविष्यातील आर्किटेक्ट होण्याचा अनुभव घेऊ शकतात आणि सूर्यप्रकाश व वाऱ्याच्या दिशेशी सुसंगत असे टॉवर उभारून एक निवासी प्रकल्प सुरुवातीपासून बांधू शकतात. यासाठी त्यांना त्यांच्या आवडीचे बांधकाम साहित्य वापरता येईल आणि प्रकल्पात सुविधा तयार करता येतील.
महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर विरल ओझा म्हणाले, "किड्झेनियासोबतच्या या खास भागीदारीची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या माध्यमातून मुलांना रिअल इस्टेट आणि शाश्वत वास्तुरचनेबद्दल जाणून घेता यणार आहे आणि आम्ही या आकर्षक जगाची सफर घडविणार आहोत. एक्स्पिरिअन्सेस सादर करून लहान मुलांमध्ये पर्यावरणाची जबाबदारी रुजविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शाश्वत विकासासाठी आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून मुलांवर संस्कार करण्याचा आणि हरित व शाश्वत भविष्य घडविण्यास सक्षम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पुढील पिढीची ऊर्जा, जाणीव व संकल्पांचा उपयोग करून घेत आम्ही शाश्वत प्रभाव पाडू शकतो आणि असे जग निर्माण करू शकतो, ज्यात त्यांना शाश्वत उपाययोजनांची जाणीव असेल.
किड्झेनिया इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर राहुल ढमढेरे म्हणाले, "लहान मुलांमध्ये शाश्वततेविषयी तळमळ जागृत करण्यासाठी महिंद्रा लाइफस्पेसेससोबत सहयोग करत असून हा एक महत्त्वाचा टप्पा घोषित करताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. या भागीदारीमध्ये किड्झेनियाचा अनुभवात्मक अध्यापनाचा दृष्टिकोन आणि महिंद्रा लाइफस्पेसेसच्या शाश्वत निवासी जागा तयार करण्याचा अविरत निर्धार यांची सांगड घालण्यात आली आहे. एकत्रितपणे आम्हाला तरुण नेतृत्वाची पिढी घडवायची आहे, जे आपल्या जगाचे भविष्य हिरवेगार करण्यात महत्त्वाची भूमिका साकारू शकतील. या अभिनव प्रवासाची सुरुवात करण्यास आणि शाश्वत जगण्याविषयीची समज मुलांमध्ये रुजविण्याचा याचा सकारात्मक प्रभाव पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत."
किड्झेनिया मुंबईत आयोजित भव्य सादरीकरण कार्यक्रमात या भागीदारीची औपचारिक घोषणा करण्यात आली आणि दोन्ही ब्रँड लीडर्सनी लहान मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात प्रेक्षणीय संचलन होते आणि महिंद्रा लाइफस्पेसेस एक्स्पिरिअन्सेसचे अनावरण करत या उत्कंठावर्धक सोहळ्याची सांगता झाली.Ends
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें