मंगलवार, 8 अगस्त 2023

कोविड-19 झालेल्या आणि स्ट्रेस टेस्ट पॉझिटीव्ह आलेल्या तरुण रुग्णाला वाचविण्यात आले यश डॉ. परीन संगोई, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल.


मुंबई
8 ऑगस्ट, 2023 (GPN): श्री. अजय सावंत (बदलेले नाव) नावाच्या 40 वर्षांच्या तरुणाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. खासकरून पायऱ्या चढ-उतार करताना त्याला थाप  लागण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले होते. सावंत यांनी मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट रुग्णालयाशी संपर्क साधला होता आणि हृदयविकारतज्ज्ञ डॉ.परीन संगोई हे त्याच्यावर उपचार करत होते. डॉ.परीन संगोई यांनी श्री. अजय यांना होत असलेल्या त्रासाचे मूळ शोधण्यासाठी काही चाचण्या करण्यास सांगितल्या होत्या. चाचण्यांमध्ये दिसून आलं ही हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या बाजूच्या धमनीमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले होते. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास तपासला असता त्याला  सप्टेंबर 2020 मध्ये कोविड-19 झाला होता आणि त्याने कोविडच्या लसीचे 3 डोसही  घेतले होते. परंतु तरुणपणीच रुग्णाला थाप लागण्याचा होत असलेला त्रास डॉक्टरांना चिंतेची बाब वाटली होती. यामुळे त्यांनी रुग्णाची स्ट्रेस टेस्ट चाचणीही (ट्रेड मिल टेस्ट) घेतली होती.  ही चाचणी 25 एप्रिल 2023 रोजी झाली होती. यामध्ये हृदयाला गरजेपेक्षा कमी रक्तपुरवठा होत असल्याचं दिसून आलं होतं. यामुळे रुग्णावर आणखी काही चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता

स्ट्रेस टेस्टचा अहवाल मिळाल्यानंतर रुग्णावर 26 एप्रिल 2023 रोजी अँजिओग्राफी करण्यात आली. यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या बाजूच्या धमनीमध्ये थर जमा झाल्याने रक्त पुरवठ्याला अडथळा येत असल्याचं दिसून आलं होतं. हे दिसून आल्याने रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं. ज्या दिवशी रुग्णाला दाखल करण्यात आलंत्याच दिवशी त्याच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली होती. धमनीमध्ये ब्लॉकेजेस असल्याचं यामध्ये दिसून आलं होतं. हे अडथळे किंवा ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी रुग्णावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते तर  28 एप्रिल 2023 रोजी रुग्णाच्या प्रकृतीत बरीच सुधारणा दिसून आली होती ज्यामुळे त्याला सामान्य वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते.

अतिदक्षता विभागातून बाहेर आणल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली आणि कोणताही त्रास रुग्णाला होत नव्हता. रुग्णाला थाप लागण्याचा त्रास दूर झाला. रुग्णाच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसल्याने रुग्णाला घरी सोडण्यात आले. मात्र घरी गेल्यानंतर औषधे आणि आहार हा नेमून दिल्याप्रमाणे काटेकोर पद्धतीने घेणे हे रुग्णासाठी गरजेचे असणार आहे.

श्री. अजय सावंत यांच्या केसवरून तरुणपणी जडणाऱ्या हृदयविकारांवर प्रकाशझोत टाकणं शक्य झालं आहे. वरकरणी अचानक थाप लागणे हे सामान्य वाटत असले तरी ते मोठ्या संकटाची वर्दी देत असते. विविध चाचण्या, स्ट्रेस टेस्ट आणि अँजिओग्राफीमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीचा विकार कळू शकला पण वेळेत रुग्णावर अँजिप्लास्टी केल्याने रुग्ण या विकारातून बाहेर येऊ शकला आणि तो ठणठणीत बरा देखील झाला.

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयाचे हृदयविकार शल्यचिकीत्सक डॉ.परीन संगोई यांनी या केसबाबत बोलताना म्हटले की, "हृदयविकाराची समस्या घेऊन आलेल्या या तरुण रुग्णावर उपचार करणं काहीसं आव्हानात्मक होतं. स्ट्रेस टेस्ट पॉझिटीव्ह आली होती आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये ब्लॉकेजेस होते. त्यात भर म्हणजे रुग्णाला पूर्वी कोविड झाला होता आणि त्याने त्यासाठीच्या लसीही घेतल्या होत्याज्यामुळे ही केस काहीशी गुंतागुंतीची झाली होती. वेळेतच अँजिओप्लास्टी झाल्याने आम्ही रुग्णाला धोकादायक स्थितीपर्यंत जाण्यापासून वाचवू शकलो. रुग्णाच्या प्रकृतीत होत असलेली सुधारणा पाहून आम्हाला आनंद होत आहे. मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णाला बरं करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही केस पाहिल्यास हृदयविकाराची समस्या असलेल्या रुग्णाची वैयक्तिक काळजी घेतत्याला होत असलेल्या त्रासाचे अचूक निदान करणे हे किती गरजेचे आहे याचे महत्त्व लक्षात येते. अचूक निदान योग्य उपचार हे आम्हाला उत्तम दर्जाच्या रुग्णसेवेसाठी निरंतर प्रेरणा देत राहते. "

श्री. अजय सावंत यांना झालेला कोविड आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली लस यामुळे रुग्णाला झालेल्या त्रासात काही अंशी भर पडली असल्याचे त्यांच्यावर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे कोविडसाठीची लस आणि हृदयविकाराचा थेट संबंध आहे कात्यामुळे किती धोका आहे याबाबत सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.

या केसमुळे अचूक निदानाची किती गरज आहे याचे महत्त्व अधिक पटते. स्ट्रेस टेस्टींगइमेजिंग पद्धतीआणि अँजिओप्लास्टी सारख्या विविध पद्धतीच्या चाचण्या आणि उपचारांद्वारे रुग्णाला असलेल्या हृदयविकाराचे कारण समजण्यास आणि ते दूर करण्यास मदत होते. कोविडसाठीची लस आणि हृदयविकाराच्या संबंधाबाबत संशोधन होऊन त्याबाबत अधिक स्पष्टता आली तर भविष्यात रुग्णांवर उपचार करण्यास त्याची बरीच मदत होऊ शकेल.

 

                                                                                                                                                                                                           


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें